"दिनांक 19/10/2022 रोजी 'शोध नाविन्याचा' या तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत रामबंधू मसाले यांचे संचालक श्री. राठी सर, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे फारूक सर, वणी ग्रामपंचायतच्या चौधरी मॅडम, तसेच ग्रामसेवक श्री. आढाव भाऊसाहेब यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आला. या कार्यशाळेत नाविन्यपूर्ण कल्पना, कौशल्य विकास, आणि स्थानिक विकासाला चालना देण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले."
"दिनांक 16/10/2022 रोजी 'मोटिवेशनल मधुरा' या उपक्रमांतर्गत सौ. मधुरा, प्रेरणादायी वक्त्या व कॉर्पोरेट ट्रेनर, यांच्या मार्गदर्शनाखाली 'आत्मविश्वासी पालकत्व' या विषयावर खास विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या व्याख्यानात पालकांना आत्मविश्वासपूर्ण पालकत्वासाठी महत्त्वाच्या टिप्स व प्रेरणा देण्यात आली."
"दिनांक 08/06/2022 रोजी द युनिक अकॅडमीच्या वतीने प्रा. भारत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी' या विषयावर एक मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक तंत्रे, अभ्यासक्रम नियोजन, आणि यशस्वी होण्यासाठीच्या महत्वाच्या टिप्स देण्यात आल्या."
"दिनांक 19/06/2022 रोजी CA महेश कोकाटे आणि CMA शिल्पा महेश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 'आयकराची संपूर्ण माहिती आणि आयकराची गणना कशी करावी' या विषयावर एक विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना आयकर संबंधित प्रक्रिया, नियम, आणि प्रभावी गणनेच्या तंत्राबद्दल उपयुक्त माहिती देण्यात आली."
"दिनांक 04/10/2022 रोजी प्रा. मिलिंद जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय ITI, नाशिक यांचे आपल्या सेंटर मध्ये '10वी नंतरचे उत्तम ITI करिअर' या विषयावर एक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ITI क्षेत्रातील संधी आणि करिअरची दिशा याबाबत उपयुक्त माहिती व मार्गदर्शन मिळाले."
"दिनांक 30/05/2022 रोजी निलेश चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली के. के. वाघ कॉलेज, नाशिक यांचे आपल्या सेंटर मध्ये 'SSC व HSC नंतरच्या डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग करिअर' या विषयावर एक प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअरची दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त माहिती व सल्ला देण्यात आला."
KRT College Vani Commerce college Seminar .