Perfect Computer Education
१९९७ मध्ये छोट्याश्या जागेत अवघ्या २ संगणकावर सुरु केलेली आपली संस्था आज 15 ,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांन पर्यंत नव नवीन तंत्रज्ञान शेअर करीत आहे . ज्याचा उपयोग अनेक विद्यार्थी मित्रांना त्यांची रोजगाराची आणि करियर ची संधी निर्माण करून देण्याचे प्रमुख कारण बनली आहे . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांचे मदतीने संगणक क्षेत्रातील सर्वच अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वी पोहोचवू शकलो .
सरकारी कर्मचाऱ्यांचे संगणक प्रशिक्षण किंवा अगदी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी ,व्यवसायिक ,गृहिणी सर्वांसाठी आपण त्यांच्या करिता योग्य असे अभ्यासक्रम सुरु करू शकलो .संगणक क्षेत्रातील आवड निर्माण करणारे एक नॉलेज सेंटर बनले आपले केंद्र .
इंटरनेटच्या डायल-अप कनेक्शन पासून आज फायबर ऑप्टिकल च्या 250 Mbps च्या वेगाचे आपण साक्षीदार आहोत . त्या मुळे नवीन होणाऱ्या सर्वच बदलांचा स्वीकार आपोआप होत गेला. फार पूर्वी काय अजूनही परीक्षे नंतर निकालाची वाट बघावी लागते पण एम एस बी टी ई ( MSBTE) आणि एमकेसील ( MKCL) सोबत आपण सुरुवाती पासूनच ( मार्च २०००) कॉम्पुटर वर परीक्षा घेऊन लगेच निकाल विद्यार्थ्यांच्या हातात दिला. अर्थात तो पर्यंत हे नवलच होते .
सध्या पूर्ण पणे ऑनलाईन पद्धतीने आणि विशेष म्हणजे टेक्नॉलॉजी च्या मदतीने म्हणजे १०+२ (सर्व्हर आणि १० क्लाईंट) अशा एकूण १२ वेब कॅमेऱ्या सोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्या च्या मदतीने संपूर्ण एक्साम चे डिजिटल रेकॉर्ड माहितीसाठी उपलब्ध असते. हा नव्याने झालेल्या बदल परीक्षा पद्धतीला खूप मदत करणारा असल्याने अशा अनेक परीक्षांच्या करीता आपले केंद्र सर्व अत्यावश्यक सेवा पुरवीत आहे .
कॉम्पुटर बेसिक पासून डिग्री पर्यंत चे सर्वच जॉब रेडी अभ्यासक्रम आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये अभ्यासले जातात व सोबत कौशल्यानुसार जॉब देखील शोधून देण्याचे काम आपण करतो.
" कामातून शिक्षण आणि शिक्षणातून फलदायी काम " या आदरणीय विवेक सावंत सरांच्या डिग्री बाबत च्या मोठ्या अत्याधुनिक निर्णया सोबत आपण काम करीत आहोत .
मिंत्रानो स्वतःच्या व्यवसायासोबत समाजाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली . यात सर्वात मोलाची साथ आपण दिलीत त्यामुळे आपल्या इन्स्टिट्यूट चे कौतुक झाले. MS-CIT या संगणक साक्षरता मिशन मध्ये तर आपण खूपच चांगली कामगिरी केली ज्याची सतत MKCL कडून नोंद घेतली गेली आणि तुमच्या मदतीने आपल्या इन्स्टिट्यूट ला अनेक पुरस्कार मिळाले हे सांगताना विशेष आनंद होत आहे .
आज २१ वर्षे पूर्ण करून नव्या पिढी सोबत आम्ही कामास सज्ज आहोत .
तुम्हाला प्रशिक्षणाचा उपयोग झाला असेल , त्याचा योग्य असा वापर तुमच्या नोकरी व्यवसायात होत असेल, आपले अभ्यासकेंद्र म्हणून तुम्ही काही सूचना करू इच्छित असाल आमच्या कडून काही उणिवा राहिल्या असतील तर या इमेल sandipkokatevani@gmail.com वर जरूर कळवा.